सोशल मीडियावर अफवा, डीलर्सकडून मात्र खंडन
नाशिक ः प्रतिनिधी
अमेरिका-इस्रायल-इराण या देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या पेट्रोल व डिझेलच्या किमती तातडीने वाढण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील तेल कंपन्यांकडे पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याने सध्या ग्राहकांवर दरवाढीचा भार पडणार नाही, असे पेट्रोल डीलर्स संघटनांनी म्हटले आहे.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाची झळ भारताला पोहोचण्याची शक्यता असून, पेट्रोलचे दर 500 रुपये लिटर जाणार असल्याची अफवा सोशल मीडिया व इतर ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. या अफवांकडे लक्ष न देण्याचे, तसेच ग्राहकांनी आवश्यक त्याच कामांसाठी वाहनाचा वापर करावा, असे आवाहन पेट्रोल डीलर्स संघटनांनी केले आहे.
अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे जगाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. या पार्श्वभूमीवर या युद्धामुळे देशावर थेट परिणाम होऊ शकतो. इराण देश पूर्वी भारताचा प्रमुख तेल पुरवठादार होता. सध्या आयात कमी असली, तरी जागतिक बाजारात पुरवठा विस्कळीत झाल्यास तेलाचे दर वाढू शकतात. त्याचा परिणाम थेट पेट्रोल व डिझेलच्या किमतींवर होतो. प्लास्टिक, खत, औषधनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात वापरली जाणारी काही रसायने भारत इराणकडून आयात करतो. पुरवठा कमी झाल्यास किमती वाढू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे लगेच पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वाटत नाही. केंद्र सरकारचे नियंत्रण असणार्या तेल कंपनीकडे पुरेसा इंधनाचा साठा उपलब्ध आहे; परंतु युद्ध जर जास्त लांबले किंवा विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यास पेट्रोल व डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तूर्तास तातडीने वाढ होण्याची शक्यता वाटत नाही.
– सुदर्शन मुरलीधर पाटील, सचिव, फामपेडायुद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे व पर्यायाने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढणे साहजिक आहे. आपले सरकार पुरवठ्यासाठी व ग्राहकांवर दराचा जास्त बोजा पडू नये यासाठी प्रयत्न करेलच. भारताकडे पुरेसा साठा आहे. मात्र, ग्राहकांनीदेखील पेट्रोल, डिझेल व गॅस आदींचा वापर योग्य तेवढाच करावा.
– विजय ठाकरे, समन्वयक, राज्य पेट्रोल डीलर्स संघटना
Say, petrol will cost five hundred rupees a liter!