चांदवडजवळ ‘छोटा हत्ती’ टेम्पोच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू; शिक्षणमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट
चांदवड, वार्ताहर
: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे आज दुपारी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ‘छोटा हत्ती’ टेम्पोने रस्ता ओलांडत असलेल्या शाळकरी मुलांना चिरडले. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली आणि डॉक्टरांना आवश्यक उपचारांच्या सूचना दिल्या.
प्राथमिक माहितीनुसार, टेम्पो चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…