नाशिक : वार्ताहर
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या होर्डिंग्जला काळे फासल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे फलक लावणार्या एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या योगेश म्हसके यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेना व शिदे समर्थक एकमेकांना च्या समोर येथे धुडघुस घालत आहे. नाशकातील एकनाथ शिदे समर्थक असलेले योगेश म्हस्के यांनी शिदेचे फलक शहर परिसरात लावले होते. नाशिक पुणे रोड वरील आंबेडकर नगर परिसरात असलेल्या शिंदेच्या बॅनरला शिवसेनिकांनी काळे फासले होते. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे योगेश म्हस्के यांच्या शिवाजीनगर परिसरात आनंद स्कूल येथील कार्यालयाबाहेर उपनगर पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नाशिक शहरात जिल्ह्यातील बंडखोर आमदार मंत्री दादा भुसे व सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसैनिकांचा विराट मोर्चा होणार आहे.
डॉ. आंबेडकरनगर समोरील योगेश म्हस्के यांच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षचे संपर्क कार्यालय असून तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये ही खबरदारी घेत पोलीस खात्याने म्हस्के यांच्या कार्यालयावर एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व 15 कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला आहे.