नाशिकरोड : घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना नारायण बापूनगर परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आपल्या कामानिमित्ताने घराबाहेर गेले असताना ही घटना घडली. अज्ञात आरोपीने या संधीचा फायदा घेत घरात एकटी असलेल्या मुलीला
फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.