नैनिताल पेक्षाही सौंदर्याने नटलेला सप्तशृंग गड एकदा पहाच!

नैनिताल पेक्षाही सौंदर्याने नटलेला सप्तशृंग गड एकदा पहाच!

सप्तशृंगी गड : छगन जाधव

नाशिक जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण,अतिशय हिरवेगार नैसर्गिक सोंदर्य, डोंगर, दऱ्या-खोऱ्या, धबधबे अशे अनेक वसुंधरेचे नटलेला सप्तशृंगी गड .

पावसाळ्यात सप्तशृंगी गडावरील सौंदर्य पाहण्यासारखं असतं. येथील हिरवागार शालू परिधान केलेली डोंगर वनराई, मनमोहक छोटे मोठे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात.
नागमोडी वळणे घेत जाणारा घाटातील रस्ता, सर्वत्र पसरलेलं दाट धुकं, रिमझिम बरसणारा पाऊस, आल्हाददायक मनमोहून टाकणारी हिरवळ आणि कोसळणारे धबधबे हे सर्व अनुभवयाचं असेल तर सप्तश्रृंग गड परिसर उत्तम पर्याय आहे. एरवी वर्षभर गडावर भाविकांची वर्दळ असली तरी पावसाळ्यात खास निसर्गसौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते आहे. देवीचे दर्शन आणि निसर्ग पर्यटन असा दुहेरी आनंद पर्यटक घेत असून पावसाळ्यात गडावर मोठ्या प्रमाणात असलेले धुके, शितकड्याहून मार्कंडेय पर्वताचे दिसणारे विहंगम दृश्य आणि वनराईने, डोंगरांनी पांघरलेला हिरवा शालू अशा अनेक गोष्टी येथे आलेल्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. त्यामुळे पावसाळ्यात गडावरील पर्यटनाचा आनंद घ्यायलाच हवा.


सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी घाट रस्ता असल्याने या घाटातून प्रवास करताना घाटात उंचावर गेल्यावर नांदुरीसह आसपासचा परिसर नजरेस पडतो. गडाच्या परिसरातील डोंगरांमध्ये असणारी दाट झाडी ही निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन घडवते. घाटात असलेल्या धुक्यातून हरवत जाणारी वाट आणि नागमोडी वळणे हे या घाटाचे वैशिष्ट्य आहे
हे गडावरील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण असून पावसाळ्यात या ठिकाणी जायलाच हवं. शितकड्यावर प्रचंड वारा आपल्या स्वागताला हजर असतो. या ठिकाणी सुमारे १५०० फुटांहून अधिक खोल दरी असून समोरच असलेला मार्कंडेय डोंगर आपले लक्ष वेधून घेतो. या ठिकाणाहून सभोवतालच्या परिसराचे विहंगम दृश्य अनुभवता येते.
धबधबे हे गडावरील खास आकर्षण आहेत. उंचावरून पडत असलेलं पाणी बघून काही धबधब्यांखाली कोसळणाऱ्या पाण्यात चिंब भिजण्याची हौसही पर्यटकांना अनुभवता येते. घाटाचा प्रवास चालू केल्यानंतर नांदुरी येथील कमानीजवळून दिसणारा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. तसेच घाटात रस्त्यालाच असलेल्या एका छोट्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद अनेकजन घेतात. धबधब्याचे फोटो काढण्यासाठी या स्पॉटवर गर्दी असते. मात्र या ठिकाणी बस थांबत नसल्याने खाजगी वाहनाने जाणाऱ्या पर्यटकांनाच येथे थांबता येते.

 

Bhagwat Udavant

View Comments

  • फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश पर्या खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश . . ' .अत्यंत निसर्गरमनीय प्रदेश महाराष्ट्राच्या निसर्ग वैभवला लाभलेले विलोभनीय असे ठिकाण सप्तशृंगी माता की जय

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

1 day ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

1 day ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

1 day ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

1 day ago