रविवार कारंजा परिसरात वनविभागाची कारवाई
नाशिक: गोरख कळे
रविवार कारंजा परिसरात सुका मेवा आणि काष्ट औषधी विक्रीच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून वन्यप्राण्याचे अवयव जप्त केले आहे. याप्रकरणी सुखलाल दगडू तेली चांदवडकर दुकानाचे संचालक दीपक सुरेश चांदवडकर यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.4) सायंकाळी वनविभागाने ही कारवाई केली.
तस्करी करण्याच्या दृष्टीने वन्यप्राण्यांचे अवयव ठेवले होते का, हा प्रकार किती दिवसांपासून सुरु आहे. आजवर किती जणांना वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री या दुकानातून झाली आहे का. या सर्वाचा तपास वन विभागाला करावा लागणार आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये अशाचप्रकारे दुकानात वन्यप्राण्यांचे अवयव असल्याची माहिती मिळ्ताच वनविभागाने हे अवयव बाळ्गणार्या संशयिताविरोधात कारवाइ केली होती. सोमवारी केलेली कारवाइची आतापर्यतची तिसरी कारवाइ आहे. याबबत माहिती अशी की, वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील सुखलाल दगडू तेली चांदवडकर दुकानात विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांचे अवयब असल्याचे समजले. त्यानुसार पश्चिम वनविभागाचे नाशिक वनवृत्ताचे वनपरीक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व इगतपुररी यांच्या स्टाफने सोमवारी सायकांळी सात वाजता चांदवडकर यांच्या दुकानावर धाड टाकली. यावेळी धाडीत विविध वन्यप्राण्यांचे अवयव मिळून आले. मिळून आलेले अवयव कोणत्या प्राण्यांचे आहेत. याची ओळ्ख पटविण्याचे काम सुरु आहे.
वन्यप्राण्यांचे अवयव बाळ्गणे गुन्हा आहे. असे कृत्य कोणीही करु नये, तसेच काहीजन अंधश्रेद्देपोटी वन्य प्राण्यांचे अवयव बाळ्गत असल्याचे बोलले जाते आहे. असे कोणीही करु नेये. याप्रकरणी संबंधितावर वन्यजीव अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येइल.
विवेक भदाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी, नाशिक वनवृत्तयापूर्वी बिबटयाच्या कातडीची तस्करी
नाशिक शरातील पार्थर्डी फाटा परिसरात एका गोणीत मृत बिबट्या आढळून आला होता. विशेष म्हणजे बिबटयाच्या कातड्यासाठी त्याची शिकार झाल्याची त्यावेळी चर्चा होती. बिबटयाची शिकार कोणी केली. त्याचा अद्याप काही थांगपत्ता लागलेला नाही.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…