नाशिक

निमाच्या विश्वस्तांची निवड

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या संस्थेच्या विश्वस्तपदासाठी धर्मदाय उपायुक्तांनी 21 जणांची निवड केली आहे. यासंदर्भात धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने 40 जणांना मुलाखतीसाठी बोलावले होते.त्यातील 36 जण मुलाखतीला उपस्थित होते .  त्यानंतर धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने 21 जणांची निवड केली आहे.

सह धर्मदाय उपायुक्त टी एस अकाली यांनी निमा संस्थेवर विश्वस्त म्हणून 21 जणांची निवड केली आहे. ही निवड निमाच्या घटनेनुसार केली आहे.घटनेत 21 जणांची निवड करण्याची तरदुत असल्याने 7 ऐवजी 21 जण निमाच्या विश्वस्तपदावर असणार आहेत.  परिणामी गेल्या काही वर्षात प्रशासक असलेल्या निमा संस्थेचा कारभार  आता परत उद्योजकांकडे असणार आहे. त्यामुळे आता तरी उद्योजकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

यांची झाली विश्वस्त पदासाठी निवड

1. जयंत नागेश जोगळेकर

2. संजय मधुकर सोनवणे

3. राजेंद्र रामचंद्र वडनेरे

4. वैभव उद्धव जोशी

5. विराल रजनीकांत ठक्कर

6. राजेंद्र किसन अहिरे

7. श्रीधर वसंत व्यवहारे

8. सुकुमार कृष्ण नायर

9. किशोर लक्ष्मीनारायण राठी

10.गोविंद शंकर झा

11. सुरेंद्र करकदेव मिश्रा

12. आशिष अशोक नहार

13. संदीप नागेश्वर भदाणे

14. धनंजय रामचंद्र बेळे

15. रवींद्र भगवंत झोपे

16. मिलिंद भरतसिंग राजपूत

17.. सुधीर बाबुराव बडगुजर

18 जितेंद्र वसंतराव आहेर

19. हर्षद मधुकर ब्राह्मणकर

20. मनीष सुशील रावल

21. नितीन प्रकाश वागस्कर

निमाला पुर्नवैभव प्राप्त   करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जुने वाद सोडून  उद्योजकांचे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन  काम करतील असा विश्वास आहे.  नवीन वर्षात निमाची नवीन सुरूवात झाली आहे. निमाची पुढील वाटचाल  उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी असेल.

         धनंजय बेळे ,(माजी अध्यक्ष निमा)

Ashvini Pande

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

6 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

6 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

6 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

6 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

6 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

7 hours ago