महाराष्ट्र

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन

नाशिक प्रतिनिधी
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन आणि तृतीय भव्य राज्यस्तरीय कामगार मेळावा आज रविवार, (दि.27 )रोजी दुपारी 11 वाजता नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका येथे संपन्न होणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे अधिवेशनाचे प्रमुख अध्यक्ष आमदार  गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष आमदार  सदाभाऊ खोत, तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.
या अधिवेशनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे, आमदार  राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, उद्योग मंत्री  उदय सामंत, आणि भाजप शहरप्रमुख सुनिल केदार प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून सरचिटणीस  सतीश मेटकरी, केंद्रीय उपाध्यक्ष अनुप खैरणार, राज्य महिला संघटक पद्मश्री राजे, तसेच नाशिक विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागतोत्सुक  व्यंकटेश मोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोतम अहिरे, व केंद्रीय उपाध्यक्ष  प्रकाश कांबळे यांच्यासह राज्यभरातील एस.टी. कर्मचारी, पदाधिकारी, व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.

Devyani Sonar

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

9 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

12 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

12 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

12 hours ago

सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना श्रावण

श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील…

12 hours ago