दिंडोरी येथील अपघातात सात ठार
अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी कळवण रस्त्यावरील शिवनेरी हॉटेल व संस्कृती लोनच्या समोर अपघातात सात ठार झाले असून अपघातामध्ये
तीन महिला तीन पुरुष व लहान बालकांचा मृतांमध्ये समावेश असून मोटरसायकल व अल्टो यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्यरात्री सुमारास मोटरसायकल व अल्टो कार यांचा अपघात झाला असून अल्टो कार मधील सात प्रवासी ठार झाले आहे तर मोटरसायकल चालवाणारे गंभीर जखमी झाले आहे.त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.मृत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील असल्याचे समजते. दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शना खाली सुरु असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची माहितीची नोंद करण्यात आली आहे .