नाशिक

गोदावरीत सर्रास सोडले जातेय गटारीचे सांडपाणी

महापालिकेवर कारवाई करा; विभागीय आयुक्तांकडे मागणी

नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदी प्रदूषण जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने दिलेले आदेेश व निरी या शासकीय पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेच्या सूचनेनुसार गोदावरी नदी व उपनद्यांमध्ये सांडपाणी जाणार नाही. तसेच सोडले जाणार नाही, याची काळजी घेणे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, तरीही नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने टाकळी गावाजवळ गोदावरी नदीत थेट गटारीचे सांडपाणी घेऊन जाणार्‍या चेंबरला फोडून थेट गोदावरी नदीत गटारीचे सांडपाणी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे याप्रकरणी महापालिकेविरोधात कारवाई करण्याची मागणी गोदावरी नदी संवर्धन समितीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

समितीने म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून टाकळी गावाजवळ दोन ठिकाणी गोदावरी नदीत थेट पाइपच्या माध्यमातून गटारीचे सांडपाणी सोडण्यात आलेले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला विचारणा केत्यानंतर त्यांनी सांगितले, गटारींचे सांडपाणी घेऊन जाणार्‍या पाइपलाइन चोकअप झाल्यामुळे आम्ही सांडपाणी गोदावरी नदीत सोडलेले आहे. नदी ही जीवनवाहिनी आहे. सांडपाणी घेऊन जाण्याची यंत्रणा नाही. उच्च न्यायालयाचे आदेश व निरी या संस्थेच्या सूचनेच्या अवमान करणार्‍या नाशिक महानगरपालिका प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना करण्यात आलेली आहे. पाहणी करताना उच्च न्यायालय आदेशित समितीचे निशिकांत पगारे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी मनीष महाजन, गणेश दवंडे, मनपाचे उपअभियंता सुनील कोकणे, पर्यावरण अभ्यासक रोशन केदार, मनोज मेघवाल, साहिल शेख आदी उपस्थित होते.

गोदावरी-नंदिनी संगमावर मलजल वाहिनीतून गोदावरी नदीपात्रात जाणारे पाणी आम्हाला दिसले. सदर काम फक्त तीन महिन्यांपूर्वीच सुरू केले आहे आणि हे पाणी तीन महिन्यांपासूनच नदीमध्ये जात आहे. प्रशासनाने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सल्लागार घेऊन गोदावरीवरील नियुक्त समितीचा विस्तार करावा, जेणेकरून अशा बाबी वेळीच लक्षात आणून मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण टाळता येईल.
– रोशन केदार, पर्यावरण अभ्यासक

गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात समितीकडे तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीची दखल घेऊन टाकळी गावाजवळ ज्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये थेट सांडपाणी सोडलेले आहे, त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहे. तपासणी अहवाल आम्ही मा. उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल आहे. त्या दाखल याचिकेमध्ये या विषयाचा आम्ही समावेश करून मा. उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये हा विषय घेऊन मनपा प्रशासनावर कारवाईसाठी मागणी करणार आहोत.
-निशिकांत पगारे, सदस्य, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त समिती

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago