नाशिक

मालती आयव्हीएफ सेंटर सील, महापालिकेची कारवाई

स्त्रीबीज तस्करी प्रकरण

नाशिक : प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे नाशिक शहरात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरची तपासणी केल्यावर संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. दरम्यान, मनपा वैद्यकीय विभागाने याप्रकरणी मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करत ते सील करत मोठी कारवाई केली आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा यांनी दिलेल्या सूचनेनुसार मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने बुधवारी (दि.4) सदर सेंटरची नोंदणी रद्द केली. सदरचे केंद्र सील करण्यात आलेे आहे. सदर ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या दस्तऐवज यांची सखोल तपासणी करुन चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. सदर चौकशी अहवाल आल्यानंतर नाशिकच्या सेंटरमध्येसुद्धा नियमाचे उल्लंघन होत आहे किंवा कसे हे स्पष्ट होणार आहे. बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. बदलापूर पूर्व येथील जोवेली भागातील एका रहिवासी इमारतीतून हे रॅकेट चालवले जात होते. आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्रीबीज काढले जात होेते. एका पीडित महिलेने मोबदलो न मिळाल्याने तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता.
शहरामधील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द केली आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या मालती आयव्हीएफ सेंटरच्या व्यवस्थापकांवर बदलापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल झाली आहे. त्यानुसार मालती आयव्हीएफ सेंटर पाचवामजला बेला विस्टा इमारत भुजबळ फार्म जवळ येथे मनपाच्या वैद्यकीय पथकाने धाड टाकून दस्तऐवज ताब्यात घेतले होते. मालती आयव्हीएफ सेंटरला मनपाने सोनोग्राफी केंद्र, एआरटी लेवल टू, एआरटी बँक व सरोगसी क्लिनिक याकरिता नोंदणी प्रमाणपत्र 2025 मध्ये नियमानुसार दिलेले होते.

नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करत ते सील करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्यसेवा यांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.
– डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा

Sexual assault on students of class 5 to 7 by class 10 boys

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago