खासगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा  विनयभंग

खासगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा  विनयभंग

लासलगाव प्रतिनिधी

येथील खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार दि २६ मार्च  रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास  लासलगाव येथील ग्रामपंचायत हॉल जवळील खाजगी क्लास मध्ये यातील दोन्ही विद्यार्थिनी अल्पवयीन आहे असे माहित असताना देखील संशयित यांनी तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखऊन त्यांच्याशी जवळीक साधुन या दोन्ही मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड व सुमित संजय भडांगे रा.गणेश नगर लासलगाव यांचे विरुद्ध भादवी का. कलम 354,354 (अ), (ड), 34, सह पोक्सो का. कलम 8,12 प्रमाणे  गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरासे करीत आहेत. लासलगाव पोलीस कार्यालयात वरील गुन्हा दाखल झाला असला तरी याबाबत इतर पालक अगर विद्यार्थिनी यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *