कळवण /प्रतिनिधी : कळवण एज्युकेशन सोसायटीचे . अध्यक्ष अँड. शशिकांत शामराव पवार यांचे आज अल्पशा आजाराने पहाटे ४ वाजता मानूर येथे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता मानूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अँड. शशिकांत पवार यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावरून कळवण शहर व तालुक्यात पसरल्यानंतर शहर व तालुक्यातील विविध पक्ष , सामाजिक, सहकार, शैक्षणिक संस्था, संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन करुन दिलासा दिला. गेल्या अनेक महिन्यापासून वृद्धपकाळामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. अँड. शशिकांत पवार यांनी कळवण एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष, नाशिक जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, कळवण वकील संघांचे मा. अध्यक्ष आदी पदे भूषवली होते. त्यांचा राजकीय, शैक्षणिक, सहकार, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, पुतणे नातवंडे असा परिवार आहे.