महाराष्ट्र

काय सांगता? सावलीही साथ सोडणार!

नाशिक : प्रतिनिधी
आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावर साथ सोडून जातो. पण एक अशी गोष्ट जी आपली साथ कधीच सोडत नाही. ती गोष्ट म्हणजे सावली. पण आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. हो आश्चर्य वाटले पण हे खरे आहे. आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. नाशिकमध्ये 19 मे रोजी नाशिकमध्ये शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणार्‍या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो. म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. नाशिक जिल्ह्यात 19 मे रोजी शून्य सावली दिवस आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे, धुळे जिल्ह्यात 31 मे, दि. 3 मे – सावंतवाडी, शिरोडा, मांगेली, खूषगेवाडी, 4 मे – मालवण, आंबोली, 5 मे – देवगड, राधानगरी, रायचूर, 6 मे – कोल्हापूर, इचलकरंजी, 7 मे – रत्नागिरी, सांगली, मिरज, 8 मे – कर्‍हाड, जयगड, अफजलपूर, 9 मे – चिपळूण, अक्कलकोट, 10 मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर, 11 मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई, 12 मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद, 13 मे – पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली, 14 मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई, 15 मे -मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्धी, सिरोंचा, 16 मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड, 17 मे – नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली, 18 मे – पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा, 19 मे – औरंगाबाद, डहाणू, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी, 20 मे – चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल, 21 मे – मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना, 22 मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी, 23 मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, 24 मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर, 25 मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा, 26 मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा, 27 मे – नंदुरबार, शिरपुर, बुर्‍हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक, 28 मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड, 29 मे – बोराड, नर्मदा नगर, 30 मे – धाडगाव, 31 मे – तोरणमाळ यानुसार जिल्हे बदलत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

1 day ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

6 days ago