आस्वाद

गूढतेचे सावट : साइड इफेक्ट्स

डिंपल पब्लिकेशनतर्फे पुणे पुस्तक महोत्सव-2025 मध्ये प्रकाशित झालेला कवी, चित्रकार रामदास खरे यांचा ’साइड इफेक्ट्स’ हा गूढकथा संग्रह वाचला.
जीवा सवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जन्माला येतानाच रिटर्न तिकीट मिळालेलं असतं. कधी ते नियमानुसार असतं. म्हणजे वयोमान, आजार किंवा अपघात असं कारण त्यामागे असतं. पण कधी मृत्यूचं कारणच कळत नाही. ती अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक घटना असते.अशा असंदिग्ध घटनांभोवती शब्दांची महिरप सुप्रसिद्ध लेखक रामदास खरे यांनी रेखाटली आहे. ही रेखाटने डिंपल पब्लिकेशनने साइड इफेक्ट या नावाने प्रकाशित केली आहेत. रामदास खरे यांचे हे अठरावे पुस्तक आणि दुसरा गूढ कथासंग्रह. यातील बाराही कथा यापूर्वी महत्त्वाच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे गूढ हे मृत्यूच्या जवळपास घोटाळत असते. अगम्य अशा मनाचे हे खेळ… हे खेळणारा माणूस खरं तर एकटाच असतो. त्याच्या मनाचा तळ अगदी कोणालाही म्हणजे त्याच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीलाही कळत नाही. सगळ्या प्रश्नांना उत्तरं नसणारे प्रश्न निर्माण करणारा हा मनोव्यापार. अबाधितमधील यशोदा आजीचा, कुत्र्याचा मृत्यू, आता नेक्स्टमध्ये कुणाचा नंबर लागेल अशी धास्ती निर्माण करणारा मृत्यू, मुक्ती देणारा मृत्यू, जगूपासून सावध राहूनही बेसावधपणे येणारा मृत्यू, कुंपणात राहणार्‍या मिलिंदला मिळालेलं मृत्यूचं सरप्राइज, मोबाइलच्या मोहजालाच्या मोहाला बळी पडलेले मोहनराव, असे आयुष्याचा आणि कथेचाही शेवट करणारे भयानक मृत्यू. शंका-कुशंकांचं वादळ, अनामिक हुरहूर लावून, विचारांचा गुंता निर्माण करणारे हे साइड इफेक्टच आहेत. कथेच्या मांडणीतून असे साइड इफेक्ट देण्यात श्री. खरे यशस्वी झाले आहेत. शब्दांच्या नेमक्या पेरणीने कथेतील पात्रे उठावदार झाली आहेत. उदाहरणार्थ, सदानकदा करवादलेली, उठवळ हे शब्द असमाधानी यशोदेला आपल्यासमोर उभे करतात. ओरखडे या शब्दाने विराजची मनोव्यथा नेमकी व्यक्त होते. आठवणींचा आग्या मोहोळ किंवा आठवणीवर बलात्कार करणारा काळोख, यातून आठवणींचा न सुटणारा ससेमिरा दिसून येतो.
जगणं मरण एका श्वासाचं अंतर बहिणाबाईंनी इतकं सोपं केलेलं मरण, न दिसणार्‍या; परंतु जीवनातील चढउतारांना कारणीभूत असणार्‍या मनामुळे भलभलते अर्थ काढायला लावते, चक्रावून टाकते, मनस्ताप देते. मनातील रंगांची उजळणी, दूर क्षितिजापाशी सुरू असलेला रंगोत्सव, माझे रंग आणि मी कमी पडतोय हा भाव, यातून लेखकातील चित्रकार डोकावत राहतो. त्यातून पुढे येत तो मुखपृष्ठावर झळकतो. साइड इफेक्ट हा सध्याचा परवलीचा शब्द. आरंभ आणि शेवट यासाठी त्याचा योग्य उपयोग करून लेखक रामदास खरे यांनी वाचकांना आपलेसे केले आहे.
आपल्या मनोगतातून लेखकाने एकूण गूढविवाविषयीचे चिंतन मांडले आहे. ते म्हणतात, ’मानवी स्वभावाचं आणि त्याच्या चमत्कृतीचं दर्शन गूढकथांमधून करण्याचा मी प्रयत्न केला आहे.’ या संग्रहाची पाठराखण (लर्श्रीील) आजचे आघाडीचे तरुण लेखक गणेश मतकरी यांनी नेमक्या शब्दांत केली आहे. ते म्हणतात, ’गूढ हे केवळ अतिंद्रिय स्वरूपाचं, दहशत दाखवणारं असत नाही, तर ते आपल्या आयुष्याशी जोडलेलंही असतं.’
त्यामुळे हुरहूर लावणार्‍या या गूढकथा सर्वांना आवडतील, यात शंकाच नाही. गूढकथा हे थोडे वेगळ्या स्वरूपाचे, अभावाने आढळणारे लेखन. ते करण्याचा आनंद रामदास खरे सतत घेत राहोत, हीच शुभेच्छा!

Shadow of Mystery: Side Effects

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

2 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

2 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

2 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

2 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

2 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

2 hours ago