देवळा : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. प्रकृती बरी नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.