बंडखोरांना शमवण्यात राजकीय पक्षांना यश
शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम
नाशिक : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज माघारीची शेवटची मुदत असल्याने अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांचे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गर्दी झाली होती. शिवसेना ठाकरे गट, भाजपा ,राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरांचे बंड शमवण्यात महायुतीला यश आल्याचे चित्र आहे. नाशिक
मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निवृत्ती अरिंगळे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता. तर दिंडोरी मतदार संघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,मात्र त्यांनीहीमाघार घेतल्याने डाॅ.भारती पवार यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महायुतीला बंड शमवण्यात यश आले मात्र जय बाबाजी भक्त परिवाराचे शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीची डोके दुखी वाढली आहे. त्यांनी माघार घ्यावी म्हणून महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील होते, सकाळपासूनच पालक मंत्री दादा भुसे ,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ , नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे या सर्वांनीच शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांनी माघार घेतली नाही.
मात्र त्यांच्या मनधरणीला अपयश आल्याचे चित्र आहे.
शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र सोमवारी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तर दिंडोरी मतदार संघात माकापाचे उमेदवार जे पी गावित यांनी देखील माघार घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दिंडोरी मतदार संघात तिरंगी लढत होणार असून नाशिक लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे चित्र आहे.
अर्ज माघारीसाठी अनिल जाधवांची भागमभाग
नाशिक लोकसभेतून महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अवघ्या दोन मिनिट आधी अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.त्यांच्यासोबत हेमंत गोडसे देखील उपस्थित होते. मात्र दोनच मिनीट बाकी असल्याने अक्षरशा : धावपळ करतच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय गाठले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची त्यांची ही धावपळ पाहून एकच चर्चा रंगली होती.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…