नाशिक: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे २९ व ३० जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांचे दुपारी ओझर विमानतळ येथे आगमन झाले.यावेळी राज्याचे माजी उपुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर,अर्जुन टिळे, मनोहर बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.