नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आज अखेर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे नवीन निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव तूर्तास कायम ठेवण्याबरोबरच नवे चिन्ह तातडीने देण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार आज निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवे चिन्ह बहाल केले आहे, आयोगाने रात्री उशिरा याबाबतची घोषणा केली,