नाशिकरोड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून, शशिकांत शिंदे यांची नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले.गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती. चार दिवसांपासून या संदर्भातील चर्चा सुरू होत्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक झाली. जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदीसह पक्षाची मंडळी उपस्थित होते.
कोण आहेत शशिकांत शिंदे?
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगावचे असलेले शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात,
1999 मधून जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे पहिल्यांदा म्हणून विजयी झाले, राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी ही शशिकांत शिंदे यांनी सांभाळले असून सध्या विधान परिषदेतील मुख्य प्रतोद म्हणून देखील त्यांच्याकडे जबाबदारी आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागलात्यानंतर 2024 मध्ये सातारा लोकसभेची निवडणूक ही शशिकांत शिंदे यांनी लढवली मात्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून ते पराभूत झाले