हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

हिंस्त्र पशुच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

लासलगाव प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील मरळगोई येथे शनिवारी हिंस्त्र पशूने मेंढ्या चारणाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात मेंढपाळाच्या हातावर व चेहऱ्यावर हिंस्त्र पशूने पंजा मारला आहे.या घटनेमुळे मरळगोई परिसरात या हिंस्त्र पशुची दहशत निर्माण झाली आहे.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार मरळगोई बुद्रुक येथे मेंढ्या चारत असतांना भाऊसाहेब रामभाऊ जाधव वय ४१ यांच्यावर शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात हिंस्त्र पशूने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात जाधव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून अज्ञात हिंस्त्र पशुचे दात लागल्याची खूण असून चेहऱ्यावरही पंजाने ओरखडले आहे.जाधव यांना लासलगाव येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या परिसरातुन काही महिन्यांपूर्वी बिबट्या पकडला गेला असल्याने सदरहू हिंस्त्र पशू बिबट्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र वनविभागाकडून याबाबत पुष्टी मिळाली नाही. मात्र सदरच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *