महाराष्ट्र

शिबिराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास शक्य: वासंती दीदी

ब्रह्मकुमारी म्हसरुळ केंद्रात बालसंस्कार शिबिर

नाशिक : प्रतिनिधी
बाल वयात मुलांवर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. उन्हाळी सुट्टीचा उपयोग विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी करावा, शिबिरात सहभागी झालेले सगळे महान आत्मे आहेत. आपल्याला काही तरी बनायचे आहे. असा विचार प्रत्येक बालक करतो. जीवनात मोठे होण्यासाठी परमपिता, परमात्मा यांचे ऐका, देवाला सर्वजण मानतात.आई वडिल हा पहिला गुरु असतो, शिक्षक हे संस्कार करतात. शिबिरात शिकलेल्या गोष्टी भविष्यासाठी उपयोगी पडतील, असे विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयाच्या नाशिक जिल्हा केंद्राच्या मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी व्यक्त केले.
म्हसरुळ येथील केंद्रावर बालसंस्कार शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ब्रह्माकुमारी पूनमदीदी, डॉ. राजेश भाई, कवी रवींद्र मालूंजकर उपस्थित होते.
वासंती दीदी म्हणाल्या की, बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याबरोबरच त्यांना विविध प्रकारचे अध्यात्म व भावी जीवनात उपयुक्त गोष्टींचे ज्ञानार्जन करण्याचे काम केले जाणार आहे. या शिबिरात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी मनोगतात शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ब्रह्मकुमारीद्वारे दिले जाणारे मूल्य व अध्यात्मिक शिक्षणाद्वारे सकारात्मक विचार. एकाग्रता, स्मरणशक्ती या गुणांचा विकास होत विद्याथ्यामध्ये सत्य-असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित होणार आहे. या शिबिरातून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक व सांघिक हालचाली,खेळ,मानसिक व शारिरिक आरोग्य, आहार, योगासने, अभ्यास कसा करावा, याबाबतची माहिती या शिबिरात दिली जाणार आहे. कवि रवींद्र मालूंजकर यांनी नाशिक जिल्ह्यातील तालुके व त्यांची वैशिष्टे कवितेद्वारे मनोरंजन करत विद्यार्थ्यांना जिल्ह्याची सफर घडविली. विविध कवितांचे सादरीकरण करत संस्काराचे महत्व सांगितले.
डॉ. राजेश भाई यांनी शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. शरीराबरोबरच मनाचे आरोग्यही महत्वाचे आहे. त्यासाठी चांगले विचार आत्मसात केले पाहिजे, शरीराला पुरेशी झोप महत्वाची आहे. मेडिटेशनद्वारे मनशांती मिळते. यावेळी मेडिटेशनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी योगाचार्या बीके रूची बहेन यांनी योगासनाचे विविध प्रकार घेतले. सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी पूनम दीदी यांनी केले. प्रास्तविक बाळासाहेब सोनवणे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत बीके मनीषा राऊत यांनी केले. आभार बीके समीना बहन यांनी मानले. यावेळी बीके. मोहन राऊत, ऍड. चिंतामण हाडपे, ब्रह्मकुमार विपुलभाई,ब्रह्मकुमार निखिल भाई, गिरीशभाई आदींसह साधक उपस्थित होते. या शिबिरात 125 मुले सहभागी झाले आहेत. 22 मे पर्यंत शिबिर होणार आहे.

 

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago