शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख वसंत पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात

शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख वसंत पाटील

यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात

इंदिरानगर| वार्ताहर | मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख वसंत आत्माराम पाटील तसेच शिवसेनेचे माजी उपमहानगर संघटक प्रकाश भिकचंद दोंदे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय माशीलकर , नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख जयंत साठे , ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वसंत पाटील हे 1982 पासून कट्टर शिवसैनिक म्हणुन पाथर्डी फाटा परिसरात काम करत होते. शिवसेनेकडून नगरसेवक साठी त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या वीस मतांनी त्यांना त्यावेळी पराभवास सामोरे जावे लागले होते. दुसऱ्यांदा मात्र पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली. त्यांची मुलगी शुक्रवंती पाटील हिच्या अपक्ष उमेदवारीने त्यांनी पुन्हा नशीब आजमावले. याही वेळी त्यांचा पराभव झाला. अनेक वर्षापासून पक्षात राहून समाजसेवा करत असल्याने त्यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. अहिराणी भाषिक मतदार त्यांच्या मागे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
यावेळी अमोल पाटील, आत्माराम पाटील, वाल्मीक पाटील, निलेश पवार, राजू बागुल, हिरामण बागुल, संतोष महाले, प्रणित कुलकर्णी, सौरभ शेवाळे, शांताराम बच्छाव, ओंकार बच्छाव, सागर निकम, गणेश साळुंखे, नरेंद्र शेवाळे ,रणजीत राजपूत, सुभाष चौधरी, गौरव शिंदे, योगेश शेटे, राहुल मोरे ,अभिमान देवरे, दीपक बोरवडे, सागर पाटील यासह असंख्य कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *