शिंदे गट ठरणार वरचढ

 

नाशिकमधील ठाकरे गटाला शिंदे गटाने सोयीस्कररीत्या  एक-एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. नुकताच नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे प्रवेश झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी चौधरी यांना आपल्याकडे खेचत ठाकरे आणि एकप्रकारे खासदार संजय राऊत यांचा करेक्ट कार्यक्रम केला. कारण चौधरी हे राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जायचे. नाशिकमधील ठाकरे गटातून सुरू झालेली आऊटगोईंग पाहता शिंदे गट ठाकरे गटावर वरचढ ठरत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेत जेव्हा बंड झाले त्यावेळी नाशिकमधील सेनेत फूट पडू नये याकरिता आम्ही एकसंघ असल्याच्या वलग्ना खासदार संजय राऊत यांच्याकडून केल्या गेल्या. राऊत यांनी दोनदा पदाधिकारी, माजी नगरसेवकांचे मेळावे घेतले. प्रत्येकाशी बंद दाराआड चर्चा केली. मात्र, शहरातील संघटनेत असलेली गटबाजी त्यावर बदल न करता कोणी कुठेही जाणार नाही अशीच सातत्याने घेतलेली भूमिका आणि याच धोरणाचा मोठा फटका ठाकरे गटाला बसल्याचा दिसतोय. ज्यावेळी दोन आमदार आणि खासदार यांनी पक्ष सोडल्यानंतर नाशकातील ठाकरेंच्या सेनेत भूकंप आला. त्यापुढे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह अकरा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. बसत असलेले धक्के एवढे मोठे आहे की, यामुळे ठाकरेंच्या सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. माजी नगरसेवकांच्या धक्क्यातून ठाकरे गट सावरत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या रूपाने  एक मास्टरस्ट्रोक मारत ठाकरे गटाला विशेषत: खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला.

सध्या ठाकरे गटातील पदाधिकारी हे माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने पक्षाला  काहीएक फरक पडत नसल्याचे सांगत आहे. मात्र, दुसरीकडे अजून काही माजी नगरसेवक सेनेला जय महाराष्ट्र करून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे ठाकरे गटाची घालमेळ वाढू शकते. पक्ष सोडणार्‍यांमध्ये आता अजून काही मोठी नावे असल्याची चर्चा आहे. आगामी काही महिन्यांत नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपर्यंत शहरात ठाकरे गटाची ताकद कमी करून शिंदे गटाला त्यांचे प्राबल्य वाढवायचे आहे. याकरिता प्लॅनिंगनुसार काम सुरू असल्याचे चित्र आहे. त्याकरिता जास्तीत जास्त माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना आपल्याकडे येण्याकडे मोठे प्रयत्न राहणार आहे.

भाऊसाहेब चौधरींच्या माध्यमातून संघटनेवर लक्ष

ठाकरे गटाचे राहिलेले जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या जाण्याने ठाकरे गटाची चिंता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण जिल्हा संपर्कप्रमुख असताना चौधरी यांच्या संपर्कात शहरासह ग्रामीण भागातील पक्षसंघटनेतील अनेक पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता थेट पक्षसंघटनेकडे शिंदे गटाने त्यांची नजर ओळवल्याने ठाकरे गटाला ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मोठे  आव्हान ठाकरे गटासमोर असणार आहे.

पालिकेत शिंदे गट- भाजप युती होणार

नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. ठाकरे गटासमोर एकच वेगळी भाजप व शिंदे गट यांचे आव्हान असणार आहे. राज्यात भाजप-शिंदे सरकार असल्यामुळे त्याचा फायदा हे दोन्ही पक्ष उठवण्याचा प्रयत्न करतील यात काही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ठाकरे गटासमोर आगामी महापालिका निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

 

 

– गोरख काळे

Ashvini Pande

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

8 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

8 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

17 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago