भाजपमध्ये समन्वय नसल्याची टीका
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत भाजपला कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी म्हणत एकप्रकारे महापालिकेत भाजप एकटाच सत्तेत बसणार असल्याचे सूतोवाच करून टाकलेे. दरम्यान, मंत्री महाजन यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून त्यांनी भाजपमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका केली आहे. तसेच युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे युतीत जायचे की, सक्षम विरोधाची भूमिका बजावायची, हे आमचे नेतेच ठरवणार असल्याचे म्हटले आहे.
महापौर पदाची निवडणूक शुक्रवारी होत असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी मंत्री महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या शिंदेसेनेने महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, असे ठरवल्याचे दिसते आहे. त्यामुळेच सोमवारी शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर पदाचे अर्ज नेले आहे. विशेष म्हणजे महाजनांच्या वक्तव्यानंतरच शिंदेसेनेने दुसर्याच दिवशी अर्ज घेतले आहे. यातून निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही, अशी रणनीती आहे का, अशी चर्चा होते आहे.
दरम्यान, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदेसेनेच्या कार्यालयात जात महायुती म्हणून आपण राज्यात, केंद्रात एकत्र सत्तेत आहोत. नाशिकमध्येदेखील आपण सत्तेत एकत्र यायला हवे, अशी भावना त्यांंनी बोलावून दाखवली होती. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी भाजप प्रदेशकडेही पाठवला होता. या सर्व प्रक्रियेचा मुंबई महापालिकेशी संबंध जोडले जात होते. मात्र, रविवारी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे आम्हाला कुबड्यांची गरज नसल्याचे म्हणत महापालिकेतील युतील ब्रेक लावल्याचे दिसून आले. मात्र, यामुळे शिंदेसेना कमालीची आक्रमक झाली आहे.
निवडणूक लढणे आमचा अधिकार
महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक लढणे, हा आमचा अधिकार आहे. मुळात भाजपमध्ये समन्वयाचा अभाव आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिवसेनेच्या कार्यालयात येऊन आम्हाला सत्तेत येण्यासाठी आमंत्रित केले. त्यावेळी राष्ट्रवादी (अ.प) पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनाही त्यांनी बोलावून घेतले होते. सत्तेत गेलो तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीने विकासाची कामे होतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, दुसर्या बाजूला महाजन यांनी असे केलेले विधान यावरून भाजपमध्ये समन्वय नाही, असे लक्षात येते. पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काय निर्णय देतील, तो आम्हाला मान्य असेल, तसेच विरोधात बसायचे झाल्यास आम्ही सक्षम विरोधी पक्ष देऊ.
– अजय बोरस्ते, उपनेते, शिंदेसेना
Shinde Sena is aggressive due to Minister Mahajan’s statement.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…