खानापुरात शिंदेंच्या आमदाराची कमाल

सर्व जागा जिंकत भाजपचा उडवला धुव्वा

सांगली : ‘मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे? माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे,’ अशा शब्दात भाजपला आव्हान देणारे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी त्यांचा गड राखला आहे. सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भाजपचा सुपडा साफ केल्याचं दिसले. खानापुरातल्या जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिवसेनेने जिंकल्या. भाजपला भोपळाही फोडता आला नाही.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जि.प. आणि पं.स. निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामध्ये सुहास बाबरांनी त्यांचा करिश्मा कायम ठेवला. जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 ही जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *