जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज व्हा : माजी खासदार हेमंत गोडसे
नाशिकरोड : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात असले, तरी मिसळ पार्ट्यांना चांगलाच ऊत आला आहे. रात्रीच्या वेळी शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल गर्दीने फुलू लागले आहेत. आजपर्यंत कोणत्याच पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर नसतानादेखील कार्यकर्त्यांना मात्र किमान निवडणूक काळात का होईना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसू लागले आहे. शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) नाशिक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीदरम्यान मिसळ पार्टीचे आयोजन पळसे ग्रामपंचायतीसमोरील शिवसेना कार्यालयासमोर करण्यात
आले होते.
संवाद मेळाव्यात नागरिकांशी संवाद साधताना कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिवसेना माजी खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असून, येथील मतदारराजा शिवसेनेच्या मागे भरभक्कमपणे उभा आहे. आज शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने जनतेतून ज्या उमेदवारांची मागणी होईल त्याचा विचार सर्वानुमते होईल. परंतु, इच्छुकांनी घराघरापर्यंत पोहोचून शिवसेनेची लाडकी बहीण योजनेसह इतर ज्या योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्या, त्यादेखील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन गोडसे यांनी केले.
‘नासाका’चे माजी चेअरमन तानाजी गायधनी व कामगार नेते विष्णुपंत गायखे म्हणाले की, पळसे गट, गणात गावातील मोठ्या प्रमाणात विविध पक्षांकडून उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, कोणत्याही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहण्यासाठी गावाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी यांनी प्रास्ताविक केले. संवाद मेळाव्यास संपर्कप्रमुख गणेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूजा धुमाळ, पुष्पा शेवाळे, महिला उपजिल्हाप्रमुख अरुणा डुकरे, उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, सदानंद नवले, तालुकाप्रमुख लकी ढोकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, माजी चेअरमन तानाजी गायधनी, अशोक गायधनी, नवनाथ गायधनी, अजित गायधनी, नाना चौधरी, शिवराम चौधरी, प्रमोद आंबरे, भास्कर गायधनी, यशवंत आगळे, वसंत ढेरिंगे, रवींद्र नरवडे, पांडुरंग ढेरिंगे, सरपंच बाजीराव जाधव, प्रल्हाद गायधनी, देवीदास गायधनी, नंदू नरवडे, मधुकर गायधनी, अनिल ढेरिंगे, संतू गायधनी, संजय गायधनी, गणेश कटाळे, जगन्नाथ सरोदे, दत्ता आगळे, सोपान गायधनी, विशाल शिंदे, पांडूनाना गायधनी, संजय गायधनी, नितीन ढेरिंगे, दीपक गोडसे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.
हेमंत गोडसे यांची जगन तात्या आगळेंना ऑफर
‘उबाठा’चे उपजिल्हाप्रमुख जगन तात्या आगळेंमुळेच मी नगरसेवक, खासदार झालो, ही पुण्याई त्यांची आहे. ते जर एकलहरेत माझ्याविरोधात लढले नसते तर मी आज येथे नसतो, ते गुरूच आहेत माझे. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसोबत यावे. त्यांना निश्चित योग्य सन्मान शिवसेनेत मिळेल, अशी ऑफरच गोडसेंनी आगळे यांना दिली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…