उत्तर महाराष्ट्र

शिवराज्यभिषेक सोहळ्यास नाशिकमधून लाखो शिवभक्त उपस्थित राहणार- करण गायकर

३५० सोन्याच्या होनांनी होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

 

नाशिक – ‘शिवराज्याभिषेक सोहळा लोकऊत्सव व्हावा,त्याची व्याप्ती जगभर पोहचावी म्हणून, २००७ साली रायगडावर एक हजार शिवभक्तांनी सुरू केलेला शिवराज्याभिषेक सोहळ्यास आज अडीच ते तीन लाख शिवभक्त प्रत्यक्ष उपस्थित राहतात.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यातील त्यांच्यावर झालेले राजमाता जिजाऊ व छत्रपती शहाजीराजे यांचे संस्कार, महाराजांचे जन्म ठिकाण,त्यांची राज्य विस्ताराची ठिकाणे,पवित्र नदी,अशा महत्त्वपूर्ण ठिकाणावरून पवित्र पाणी (जल) आणले जात आहे. तरी लाखो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे” असे आवाहन युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या वतीने करण गायकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत केले.
६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने नाशिक येथील शासकीय विश्राम गृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य करण गायकर यांनी बोलताना सांगितले की.पाच व सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा साजरा होत आहे. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे,असे आवाहन नाशिक अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे करण्यात येत आहे.

राज्याभिषेक सोहळ्याची रूपरेषा

५ जून सायं ४ वाजल्यापासून महादरवाजा पूजन,तोरण बांधणे, रायगड जिल्हा प्रशासन, २१ गावातील सरपंच,पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या हस्ते गडपूजन,’धार तलवारीची,युद्धकला महाराष्ट्राची शिवकालीन युद्धकलांची मानवंदना, जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा शाहीरी मानवंदना, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन.
६ जून सकाळी ७ पासून राणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण,शाहीरी कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन, युवराज संभाजी छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व राजसदरेवर आगमन,युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक,युवराज संभाजी छत्रपती यांचे शिवभक्तांना संबोधन,जगदीश्वराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान,जगदीश्वर दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.

नाशिककरांना विशेष मान

त्यामध्ये जगदीश्वराच्या मंदिराची सजावट,नाशिकच्या मोरया लेझीम पथक,शिव रुद्रा वाद्य पथक,मार्तंड भैरव ढोल ताशा पथक,सिंह गर्जना वाद्य पथक,कलाक्षेत्र वाद्य पथक हे सर्व ढोल पथकांना मानवंदनेचा सन्मान मिळाला आहे.नाशिकचे भूमिपुत्र शाहीर स्वप्निल डुंबरे यांचा शाहिरी पोवाडा,वारकरी पथक,रण मैदानी खेळांचे होळीच्या माळात प्रात्यक्षिक सादरीकरण करण्याचा बहुमान नाशिककरांना मिळाला असल्याने नाशिककरांसाठी हा भाग्याचा व आनंदाचा क्षण आहे तसेच राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्यावतीने रायगडाच्या पायथ्याशी येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

या पत्रकार परिषदेसाठी करण गायकर, केशव गोसावी,विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोखे,आशिष हिरे, डॉ.रुपेश नाठे,नितीन पाटील,वैभव दळवी,भारत पिंगळे,सागर जाधव,रवी धोंगडे,अनिल निकम,दादासाहेब जोगदंड,प्रवीण गोसावी,मनोरमा पाटील,पुष्पां जगताप,रेखा जाधव, रागिणी आहेर,आशा पाटील, सुलक्षणा भोसले,उलका पुरणे, रेखा पाटील,राणी कासार,सैफाली शर्मा,दीपक साळुंके,तेजस गांगुर्डे, अमोल जगळे,विशाल घागस, आधी उपस्थित होते.

शिस्त पाळावी

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा जगभरात साजरा होत असताना या सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी कुठल्याही अमली पदार्थाचे सेवन करू नये. किंवा असे कुठलेही अमली पदार्थ सोबत आणू नये छत्रपती शिवाजी महाराजांचे वैभवशाली आचार विचार आपल्याला लाभले असल्याने आपण सर्वांनी त्याचे पालन करणे गरजेचे आहे.प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या गडावर कुठेही फेकू नये ज्या ठिकाणी आपल्याला जागा करून दिल्या आहेत त्याच ठिकाणी त्या टाकाव्यात शक्यतो प्लास्टिकच्या नेलेल्या सर्व वस्तू आपण स्वतःच  खाली घेऊन याव्यात त्या ठिकाणी समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे आपण तंतोतंत पालन करायचे आहे हा शिवराज्याभिषेक महोत्सव सोहळा मोठ्या आनंदात पार करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी स्वतःला शिस्त दर्शन घडवून दाखवायचे आहे.
करण गायकर 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती सदस्य.

Bhagwat Udavant

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

16 minutes ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

1 day ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

1 day ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

1 day ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

1 day ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

2 days ago