शिवरायांच कार्य जिजाऊंच्या संस्काराच प्रतिबिंब

प्रा.सचिन कानिटकर यांचे प्रतिपादन

नाशिक : प्रतिनिधी
शिवरायांवर माता जिजाऊंच्या संस्कार आहेत म्हणून महाराज इतके भव्य कार्य करू शकले. हेच जिजाऊंच्या संस्काराच प्रतिबिंब आहे असे प्रतिपादन क्रांतीशाहीर प्रा.सचिन कानिटकर यांनी केले.संस्कृती, नाशिक यांच्यावतीने सुरु झालेल्या तीन दिवसीय ‘राजमाता जिजाऊ ‘  व्याख्यानमालेच्या शुभारंभाच्या दिवशी प्रा. कानिटकर बोलत होते.

माता जिजाऊंनी शिवरायांवर संस्कार केले म्हणून माता भगिनी सुरक्षित राहिल्या आहेत. राजमाता जिजाऊंना जन्मापासून मिळालेल्या संस्काराचा परिपाक म्हणून छत्रपती शिवराय निर्माण होऊ शकले. त्याचमुळे घरोघरी मातेवर आधी संस्कार होणे गरजेचे आहे. त्यानंतर घरोघरी आपले घराणे, राज्य आणि धर्मावर निष्ठा राखणारी रयत तयार होऊन राज्याचे संरक्षण होऊ शकेल.

कालिदास कलामंदिर नाट्यगृहात सुरु झालेल्या या व्याख्यानमालेत प्रा. सचिन कानिटकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्माआधीपासूनच्या इतिहासाचे दाखले देत महाराष्ट्रावर झालेल्या आक्रमण आणि येथील माणसांवर झालेल्या संस्काराचा गोषवारा सांगितला. महाराष्ट्रात श्रीकृष्णाचे घराणेच नाही तर त्याआधी श्रीरामचंद्रानेही महाराष्ट्रासारख्या दंडकारण्यात आपले पाय रोवले आहेत. त्यामुळेच रामकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत देवगिरी साम्राज्यात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. या साम्राज्यात महादेवराव यादव, रामदेवराय यादव आणि शंकरदेव यादव यांच्यासारखे शूर राजे होऊन गेले. याच घराण्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्यावर झालेल्या राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम आणि रयतेच्या सेवेचे प्रेमाचे संस्कार पुढे भोसले घराण्यात आपल्याला बघायला मिळतात. याचमुळे समाजात चांगले संस्कार निर्माण करण्यासाठी मातेच्या जन्मापासून संततीवर संस्कार होण्याची गरज निर्माण झाली आहे. विज्ञानानेही यांवर पुष्टी दिली आहे. जेनेटिक वारशानुसार अपत्यांमध्ये ते ते गुण उतरतात, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. यावेळी प्रा. कानिटकर यांनी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी जिजाऊंच्या जन्मापर्यंतचा इतिहास सांगितला. तानाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशातील स्नुषा प्रा. डॉ. शीतल घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, शिवकाळात लेकीबाळी सुरक्षित होत्या. जगावे कसे हे शिवरायांनी शिकविले तर मरावे कसे हे छत्रपती संभाजी राजांनी या रयतेला शिकविले. प्रत्येक मातेने आपल्या मुलाला राजमाता जिजाऊंचे संस्कार रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात व्यासपीठावर संस्कृती, नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. प्रा. शीतल मालुसरे, विजय साने, शोभा बच्छाव, अशोक मुर्तडक, हरीभाऊ लोणारी, गोकुळ पिंगळे, यतीन वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुराधा बस्ते यांनी केले.

जिजाऊ पालखीची शोभा यात्रा

राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेनिमित्त सुरुवातीला रोकडोबा व्यायामशाळेपासून जिजाऊ पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा रोकडोबा हनुमान मंदिर, नेहरू चौक, मेनरोड, महात्मा गांधी मार्ग, सावाना, शालीमार, खडकाळी, अण्णाभाऊ साठे चौकमार्गे कालिदास कलामंदिरात झाली.

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला प्रतिसाद

तानाजी मालुसरेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या कवड्यांच्या माळेचे दर्शनही नाशिककरांना झाले.कालिदास कलामंदिर येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनाही भरविण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यास शिवभक्तांनी  गर्दी केली होती.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago