शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच
शिंदे गटाला मुंबई हायकोर्टाचा दणका
मुंबई : शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाची तसेच पालिकेची याचिका फेटाळून लावली.
शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पालिकेकडे अर्ज केला होता. त्यावर पालिकेने शिंदे गट आणि ठाकरे या दोघांचाही अर्ज नाकारल्याने उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पालिकेने परवानगी नाकारुन अधिकाराचा दुरुपयोग केल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले तसेच शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयामुळे शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे.