वचन मोडणारे रामभक्त कसे होऊ शकतात
उद्धव ठाकरे यांचा सवाल
नाशिक: प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, वचनासाठी त्यांनी राज्याचा त्याग केला, जे आज राम राम करत आहेत त्यांनी वचन मोडले होते, आणि असे वचन मोडणारे राम भक्त कदापि होऊ शकत नाही, रामाचा आदर्श यांच्यात शोधून तरी सापडेल का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सातपूर येथील अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर ही तोफ डागली. आपली शिवसेना वाली ने पळवली, या वालीचा वध करायचा आहे, शिवसेना ही माझा वडिलांनी स्थापन केली, शिवसैनिक मला वारसा हकाकने मिळालेले आहेत, ते वडिलोपार्जित आहेत,