शिवसेनेच्या दांडिया कार्यक्रमास खासदार गोडसेंची हजेरी

सेनेच्या माजी नगरसेवकांच्या वतीने आयोजित दांडिया कार्यक्रमास खासदार गोडसे यांची शुभेच्छा भेट राजकीय तर्क वितर्कांना उधाण

इंदिरानगर: वार्ताहर  खासदार हेमंत गोडसे यांनी प्रभाग क्रमांक ३१ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने पाथर्डी फाटा येथे भरवलेल्या रास दांडिया कार्यक्रमाला शुभेच्छा भेट दिली. यामुळे राजकीय तर्क वितर्कांना उधान आले आहे.
पाथर्डी परिसरात लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे व राहुल भुजबळ यांनी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला हेमंत गोडसे यांनी हजेरी लावली. यांच्यासोबत शिंदे गटाच्या महिला प्रमुख रश्मी ताठे, युवा प्रमुख योगेश मस्के, नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक बंटी तिदमे यासह शिंदे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते .खासदार गोडसे यांनी शुभेच्छा देताना लोकसेवा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्या या उपस्थितीने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा :शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला

पाथर्डी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. याअगोदर देखील शिवसेनेचे नगरसेवक या भागातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची मजबूत पकड या भागात पाहायला मिळते. ही पकड धिली करण्याच्या दृष्टीने खासदार गोडसे या भागात तर आले नव्हते ना? असा प्रश्न उपस्थितांना पडला. मागील चार दिवसापूर्वीच शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी देखील पाथर्डी फाटा परिसरातील साईबाबा मंदिरात भेट दिली होती. या मंदिराची व्यवस्था देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. या साई मंदिरापासून पाचच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या दांडिया कार्यक्रमाला खासदार गोडसे यांनी भेट दिली. यामुळे या भागात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसून येत आहे
चौकट –
दांडिया कार्यक्रमाचे आयोजक असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे मात्र यावेळी स्टेजवर उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थित खासदार गोडसे यांच्यासह उपस्थितांचे सत्कार झालेत. डेमसे यांची अनुपस्थित म्हणजे ” तुम्ही व्हा पुढे, मी आलो मागून…” असे तर नसेल ना हे पाहणे आत्सुकौचे ठरेल.

हेही वाचा :नाशकात शिवसेनेला धक्का : माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात : प्रवेश होताच महानगरप्रमुखपदी नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *