शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा

शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांचा राजीनामा

पळसे : प्रतिनिधी

माजी मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उपनेते म्हणून ओळख असलेले बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान घोलप यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये चांगलीच खळबळ उडाली असली तरी घोलप कोणत्या पक्षात जात की आहे तेथेच रहातात यावरती मात्र मतदार संघात नागरिका मधे तर्कवितर्क सुरु असुन घोलपांच्या भूमीकडे आता सर्वच राजकीय पक्ष देखील लक्ष ठेवून असल्याचे चित्र आहे.

बबनराव घोलप शिवसेनेचे हे ज्येष्ठ नेते असून १९९५ मध्ये शिवसेना व भाजप युतीची सत्ता असताना समाजकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होते पंचवीस वर्ष ते देवळाली मतदारसंघाचे आमदार होते तर पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप हे आमदार होते. शिर्डी लोकसभा मतदार लोकसभा मतदार संघात त्यांचा दांडगा संपर्क होता त्याचप्रमाणे २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार होती मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना उमेदवारी स्वीकारता आली नाही. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदार संघातून बबनराव घोलप यांना उमेदवारी देण्यात येणार होती त्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी केली होती अनेक वेळा मतदार संघाचा कार्यकर्त्या समवेत दौरा करून प्रचारही सुरू केला होता त्याचप्रमाणे ते शिर्डी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सुद्धा होते . त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले असतानाच. घोलप यांना विश्वासात न घेता शिर्डी लोकसभा मतदारस मतदार संपर्क प्रमुख पदी माजी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याने बबनराव घोलप व त्यांचे सहकारी नाराज झाले. त्यातच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंधरा दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटात मातोश्री येथे जाऊन प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वाकचौरे यांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. या सर्वच निर्णयामुळे बबनराव घोलप व त्यांचे समर्थक नाराज झाले . परिणामे बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.

 

गेल्या अनेक वर्षापासून देवळाली विधानसभा मतदार संघात व शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी काम करत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपण सातत्याने दौरा करत होतो मात्र अचानक मला विश्वासात न घेता तिथे संपर्क प्रमुख म्हणून माजी आमदार सुनील शिंदे यांची नेमणूक केली त्यामुळे आपण नाराज झालो व आपल्या पदाचा राजीनामा दिला.

बबनराव घोलप

शिवसेना ठाकरे गट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *