नाशिकच्या शिवसेनेत लवकरच खांदेपालट

माजी नगरसेवकांसमवेत खा. राऊत यांची बंद दाराआड चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेत बंड झाल्यानंतर नाशिकमधील शिवसेनेतील पक्ष संघटन मात्र अद्यापपर्यत टीकून आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक पक्षातील अंतर्गत बंडाळीला कंटाळून शिंदे गटत जाणार अस्ल्याची जोरदार चर्चा होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा होणार असल्याची राजकीय चर्चा शहरभर सुरु होती. ही कुणकुण थेट मातोश्रीपर्यंत पोचल्यानंतर अभेद असलेला हा गड शाबूत ठेवण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख व शिवसेना नेते खा. संजय राउत यांनी शुक्रवारी (दि.2) सर्व माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांची वन टू वन चर्चा केली. यावेळी त्यांनी कोणाची काय नाराजी आहे. हे जाणून घेतले. या सर्व घडामोडीनंतर आता पक्ष श्रेष्टीकडून नाशिकमधील पक्षसंघटनेत लवकरच खांदे पालट होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिंदे गट हा ठाकरे गटातील नाराज माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील ठाकरेंच्या पक्षात काही माजी नगरसेवकांमध्ये दोन गट पडल्याचे बोलले जातेय. शुक्रवारी खा. राउत यांच्याकडे याचप्रकरणी काही जनांनी पक्षातील गटबाजीमुळे उघड नाराजी व्यक्त केल्याचे समजतेय. आम्ही शिंदे गटात जावे याकरिता पक्षातीलच दुसरा गट अंतर्गत कारवाया करत असल्याचा आरोप काही नाराज मा. नगरसेवकांनी केल्याचे बोलले जातेय. आम्ही ठाकरे यांची सेना सोडणार नसतानाही आमच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्षातीलच काहीजन संशयाचे वातावरण तयार करत आहे. अशी नाराजी खा. राउत यांच्याकडे केल्याचे समजतेय. विशेषत: पक्षातीलच काहीजन राजकीय स्पर्धक माणत असल्याने कट कारस्थाने सुरु आहे. दरम्यान नाशिकमधील पक्ष संघटनेत फूट पडू नये याकरिता ठाकरे गटाने तत्परता दाखवत खा. राउत यांनी नाशकात माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची भेट घेत पक्ष हा कुनाचा नसून कोणावरही अन्याय होणार नाही. होणारे सर्व निर्णय मातोश्री येथून होतात. तुम्ही संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहिला आहात. कुणी कुठेही जाउ नये. भविष्यात सेनेची ताकद वाढणार असल्याचा विश्वास पदाधिकार्‍यांना खा. राउत यांनी दिल्याचे बोलले जातेय. दरम्यान पुढच्या काही दिवसात लवकरच ठाकरे गटातील शहराच्या पक्ष संघटनेत बदल होण्याची शक्यता आहे. विशेषत: यावर पक्षाला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. जेथे सेनेचे माजी नगरसेवक आहे. त्याच जागेवर दुसरा उमेद्वार देण्यासाठी केले जातायेत. अशी नाराजी काही माजी नगरसेवकांनी खा. राउत यांच्यासमोर मांडली. यावेळी काहींनी थेट आपल्याविषयी कारस्थाने सुरु आहेत.अशांची नावेच राउत यांना सांगण्यात आल्याचे बोलले जातेय. शिंदे गटात काही माजी नगरसेवक जाणार असल्याची बातमी मुंबइत पोचताच खा. राउत यांनी नाशकात येउन परिस्थिती हाताळून ड्ॅमेज कंट्रोल अरण्याचा प्रयत्न केल्याचे दसून येतेय. त्यामुळे खा. राउत यांनी योग्यवेळ नाशिक गाठत सेनेतील फूट टाळ्ण्यात यश आल्याचे बोलले जातेय.

चौकट…
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडनार
शुक्रवारी खा. संजय राउत यांनी माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची व्यक्तीगत चर्चा केली. यानंतर आता नाशिकमध्ये लवकरच पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर विराट सभा होणार असल्याचे खा. राउत यांनी सांगित्रले. ही सभा विशाल करायची असून त्यासाठी तयारी लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान खा. राउत यांच्यानंतर खुद्द ठाकरे येणार असल्याने पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये सुरण व उत्साह संचारनार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *