लासलगांव प्रतिनिधी
नासिक-औरंगाबाद राज्य मार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान नादुरुस्त शिवशाही बसला भीषण आग लागल्यामुळे या आगीत शिवशाही बस संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे घडली आहे या शिवशाही बसच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने निघालेली शिवशाही बस येवला तालुक्यातील देशमाने येथे मध्यरात्रीच्या दरम्यान नादुरुस्त झाल्याने या शिवशाही बसमधील दहा ते पंधरा प्रवासी दुसऱ्या एसटी बस मध्ये बसवुन देण्यात आल्यानंतर ही नादुरुस्त शिवशाही बस नाशिक येथे घेऊन जात असताना नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे पालखेड डाव्या कालव्याच्या पुलावर मंगळवारी मध्यरात्री अचानक पेट घेतल्याने चालक आणि वाहकाने उडी घेतली.यानंतर डायल 112 वर कॉल करत माहिती दिली असता लासलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.ही घटना निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत होती तरीसुद्धा तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले परंतु अग्निशमन दलाची गाडी येण्याअगोदर संपूर्ण शिवशाही बस ही आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे
अगोदरच या शिवशाही बसमधील प्रवासी दुसर्या एसटी बसमध्ये बसून दिल्यामुळे या नादुरुस्त शिवशाही बसला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे या शिवशाही बसला लागलेल्या आगीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रार्थमिक माहिती मिळत आहे याप्रकरणी अधिक तपास निफाड पोलीस करत आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…