धक्कादायक नाशिकरोडला अनधिकृत सोनोग्राफी मशीन चा वापर
हॉस्पिटल आरोग्य विभागाच्या अधीक्षकाचे मनपाकडून मशीन सील
नाशिकरोड : प्रतिनिधी
पालिकेच्या आरोग्य विभागातील अधीक्षक असलेल्या रुग्णालयात अनधिकृत सोनोग्राफी आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान हे मशीन सील करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील देवळाली गाव महसोबा मंदिर समोर असलेल्या श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने या अनधिकृत सोनोग्राफी मशीन वर छापा टाकला. याप्रकरणी पालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत माहिती अशी कीं, या सोनोग्राफी प्रकरणी पालिकेकडे तक्रारी येत होत्या. अखेर आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे पालिकेचे आरोग्य चे अधीक्षक डॉ राजेंद्र भंडारी आणि डॉ सुनीता भंडारी यांच्या मालकीचे हे हॉस्पिटल असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आम्ही हे हॉस्पिटल दुसऱ्यास चालवीण्यास दिल्याचा दावा भंडारी यांनी केला आहे. तर ज्या डॉक्टरांना ही हॉस्पिटल व सोनोग्राफी मशीन दिले होते त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही काही दिवसापूर्वी हे रुग्णालय संबंधिताच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून एकनेकावर टोलवा टोलवी सुरु आहे. दरम्यान या सोनोग्राफी मशीनची कुठेही नोंद झालेली नाही. त्यामुळे याप्रकरणी संशय अधिक बळावला आहे. म्हणून आता पालिका कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे. मनपाकडून झालेल्या या कारवाईत हॉस्पिटल मधील सोनोग्राफी मशीन सिल करण्यात आले असून अनधिकृत सोनोग्राफी मशीन मधून कुठल्या प्रकारचे अहवाल घेतले जात होते. याची चौकशी केली जाणार आहे. असेही पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.