नाशिक

दुकान निरीक्षक लाच घेताना जाळ्यात

दुकान निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले, मागच्याच आठवड्यात मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना पकडले होते, आज पुन्हा एका महिला अधिकारी लाच घेताना जाळ्यात सापडल्याने लाचखोरीत महिला देखील मागे नसल्याचा प्रत्यय येत आहे,
तक्रारदार यांचे हॉटेल असून हॉटेलमध्ये बालकामगार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान निरीक्षक निशा आढाव यांनी हॉटेल चालकास बालकामगार नसल्याचा निरंक अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपये ची लाच मागितली होती तक्रारदाराने याबाबत  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी उपाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर पोलीस नाईक मनोज पाटील शितल सूर्यवंशी अजय गरुड यांच्या पथकाने सापळा रचला त्यात निशा आढाव  कामगार उपायुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ   जाळ्यात अडकल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

21 minutes ago

सिन्नर पालिकेत 15 प्रभागांत निवडून येणार 30 नगरसेवक

प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…

25 minutes ago

मनमाडला प्रभागरचनेबाबत कहीं खुशी कहीं गम

नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…

31 minutes ago

त्र्यंबकेश्वरला सुट्ट्यांमुळे व्यवस्था कोलमडली

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…

35 minutes ago

जनआक्रोश मोर्चाची तयारी; मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे विभागवार मेळावे

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…

39 minutes ago

एमडी विक्री करणारे तीन आरोपी अटकेत

एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…

43 minutes ago