नाशिक

नगरसूल ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शनचा तुटवडा

रेबीजचे इंजेक्शन नसल्याने रुग्णांची गैरसोय

वास्तविक पाहता येवला तालुका हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दोन आमदार असतानादेखील या तालुक्यातील रुग्णालयामध्ये इंजेक्शनचा तुटवडा असल्याने गोरगरीब गरजू रुग्णांचे मोठे हाल होत असल्याची खंत गरजू लोक करीत आहेत.
नगरसूल ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध होऊन या रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी, डॉक्टरांनी कोविड (कोरोना काळात) रुग्णांना मोठा दिलासा दिला, परंतु त्यानंतर रुग्णालयात कुठल्याही प्रकारची गरीब गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नसल्याचे तक्रार रुग्ण करत आहेत.
या रुग्णालयात तीस बेडची उपलब्धता असताना रुग्णालयाच्या बांधकामामुळे आता मात्र इमर्जन्सी काळात फक्त एक बेड उपलब्ध आहे. डिलिव्हरीसाठीदेखील एकच बेड उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या रुग्णालयात दररोजची ओपीडी 60 ते 100 पर्यंत होत असून, यात मोठ्या प्रमाणात कफ, सर्दी, खोकला यांसारखे रुग्ण जास्त आहेत. टायफाइडसारखे रुग्णदेखील येतात. रुग्णालयात विंचूदंश व सर्पदंशाचे इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु रेबीजचे व टीटीचे इंजेक्शन उपलब्ध नाही. ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण मोठ्या शहरांतील कर्मचारी ग्रामीण भागात नगरपालिका भागातून भटकी कुत्रे सोडतात. यावर नगरपालिकांना थांबवणे गरजेचे आहे.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago