नाशिक

निफाड उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा

गरीब रुग्णांचे हाल; पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्याची मागणी

निफाड : प्रतिनिधी
सर्वसामान्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय नियमाप्रमाणे मोफत उपचार केले जातात. मात्र, उपचारानंतर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळ्याचे वातावरण असून, अनेक रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत आहेत. कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते; परंतु अतिमहत्त्वाची लस रुग्णालयात मुबलक प्रमाणात नाही, तिला बाहेरील मेडिकलमधून रुग्णांना खरेदी केल्यास पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत त्याची किंमत मोजावी लागते. शहरी व ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे मोलमजुरी करणारी असल्याने ही लस बाहेरून विकत घेणे शक्य होत नाही. ही महत्त्वाची लस रुग्णालयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवरील औषधांसह सलाईनचाही तुटवडा जाणवत आहे, कॅल्शियम टॅब्लेट, कॅल्शियम सिरप बॉटल, पित्ताच्या गोळ्या, वेदनाक्षम मलम यांचा तुटवडा असून, रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयातून औषधांचा पुरवठा केला जातो. परंतु, जिल्हा रुग्णालयातच पुरेसा साठा शिल्लक नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णालयांवर त्याचा परिणाम होत असल्याचे मत रुग्णालयातील कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. नियमित औषधे न मिळाल्यास आजारात गुंतागुंत वाढू शकते आणि रुग्णांची प्रकृती अचानक खराब होण्याचा धोका वाढतो. विशेषतः वृद्ध, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजाराने पीडित रुग्णांसाठी औषधांचा तुटवडा गंभीर ठरू शकतो. शासनाने रुग्णालयांना अपुरा औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून गोरगरीब जनतेचे उपचार घेताना हाल होणार नाही. रुग्णालयातच वेळेवर औषधे मिळतील व त्यांच्या खिशाला झळ बसणार नाही, अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

वरिष्ठ कार्यालयास औषध पुरवठ्याबाबत वारंवार लेखी व मौखिक मागणी केली जात आहे. वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्था जसे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उपलब्ध अतिरिक्त असलेला औषधीही मागविली जातात. स्थानिक पुरवठादारांना उपलब्ध निधीमधून औषध खरेदीसाठी पुरवठा आदेश पारित करावा.
डॉ. राजीव तांभाळे, वैद्यकीय अधीक्षक, निफाड

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago