नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा ‘शॉर्टकट’

 

सर्रास ओलांडतात रेल्वे रुळ, दुर्घटना घडण्याची भीती

रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा
रेल्वे पकडण्याची घाई
फुकट्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर

नाशिक : विश्‍वजित शहाणे

रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक तर आहेच शिवाय अशा प्रकारे रुळ ओलांडणार्‍यांवर रेल्वे कारवाईचा बडगाही उगारत असते. मात्र, तरीही नाशिकरोड येथील रेल्वे स्टेशनवर प्लॉटफार्मवर जाण्यासाठी जिन्यांचा अथवा लिफ्टचा वापर न करता प्रवाशी रेल्वे पकडण्यासाठी सर्रासपणे रेल्वे रुळ ओलांडत असल्याचे चित्र आहे. यातून संभाव्य दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर असणार्‍या सर्व फ्लॅट फॉर्मवर स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी व इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे पूल करण्यात आलेले आहेत. परंंतु प्रत्येकालाच रेल्वे पकडण्याची घाई असते तर काही विनातिकिट प्रवास करणारे टीसीपासून वाचण्यासाठी रेल्वे स्थानकावर स्लो होण्यापूर्वीच रेल्वेतून उड्या मारत रूळ ओलांडतानाचे प्रकार पाहावयास मिळतात.
प्रवासी इतर प्लॅटफॉर्मवर व रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघण्यासाठी पुलाचा वापर न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून व लहान मुलं कुटुंब हजारो लोक रोजचा प्रवास करतात. मात्र नाशिकरोड रेल्वे प्रशासन कर्मचारी, टीसी, रेल्वे पोलीस मात्र बघून पण दुर्लक्ष करतात. यामुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडू शकते. बेशिस्त रेल्वे प्रवाशांवर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा  नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकते. रेल्वे प्रशासनाने कर्मचार्‍यांनी रेल्वे पोलीस अधिकारी जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. नियमांचे उल्लंघन करणारे व  रेल्वे प्लॅटफॉर्म मधून जाणार्‍या येणार्‍या रेल्वे प्रवासी यांच्यावर रेल्वे पोलिसांनी व कर्मचार्‍यांनी दंडात्मक कारवाई करण्यात यावी.  ठिकठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावे. मात्र, तरीही जे प्रवाशी ऐकणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. नाशिकरोड हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. देशभरातून नागरिक या स्थानकावरुन प्रवास करतात. त्यात अनेकजण रेल्वे आल्यानंतर ती पकडण्याच्या नादात सर्रासपणे या फ्लॉट फार्मवरुन दुसर्‍या प्लॉटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून घाईमध्ये रेल्वे पकडतात. यातून रेल्वे न दिसल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होते आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

नाशिकरोड येथील रेल्वेस्थानकावर अशा प्रकारे  प्रवाशांकडून सर्रासपणे रेल्वे रुळ ओलांडले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *