शिंदे येथील कामावरून आमदार खासदारात श्रेयवाद



आमदार सरोज अहिरे नंतर खा. गोडसे म्हणतात आपल्यामुळे मिळाला निधी

नाशिक : प्रतिनिधी

काहीच दिवसापूर्वी देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी शिंदे टोल नाक्या येथील बाजूला असलेल्या नाल्या करिता शासनाकडून 3 कोटी 90 लाख रुपये मंजूर करून आणल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. पावसाळ्यात नाल्यातील पाणी थेट बाहेऊ पडून शिंदे गावातील काही घरामध्ये घुसून मोठे नुकसान होत होते. मात्र या कामाला निधी मंजूर झाल्याने मोठा प्रश्न मार्गी लागल्याचे आ आहिरे यांनी म्हटले होते. दरम्यान ज्या कामासाठी आमदार सरोज अहिरे यांनी निधी मिळवळ्याचे सांगितले असता आता त्याच कामासाठी आपण पाठ पुरवठा केल्याने केंद्राकडून निधी मिळाल्याचे खा हेमंत गोडसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे एकाच कामावरून आमदार आणि खासदार यांनी दावा केल्याने हा हा विषय चर्चेचा ठरला आहे.

यापूर्वी देखील कामाच्या श्रेयवादावरून खासदार हेमंत गोडसे आणि भाजप आमदार यांच्यात दावे प्रतिदावे झाले होते. कामाच्या श्रेय वरवरून हा पूर्व इतिहास असताना आता राष्ट्रवादी च्या आमदार सरोज अहिरे आणि शिंदे यांच्या सेनेतील खासदार हेमंत गोडसे यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नाने शिंदे टोल नाका परिसरातील नाला दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामाला ३ कोटी ९० लाखाचा निधी मिळाल्याचे आमदार आहिरे यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात महामार्गावरील पाणी शिंदे गावातील घरांमध्ये घूसून मोठे नुकसान होत होते, सबंधित नाल्याची दुरुस्तीसाठी आ.सरोज अहिरे यांनी ३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे आ आहिरे यांनी सांगितले होते. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावातील टोल नाक्याजवळ असलेल्या नाल्यातून वाहून जाणा-या पाण्यामुळे तीन वर्षांपासून पावसाळ्यात या परिसरातील घरात पाणी शिरुन प्रचंड नुकसान झाले होते, या विषयावर ग्रामस्थांनी आ.अहिरेची भेट घेत मागणी केली होती, त्यांनतंर मुंबई येथील कोकण भवन येथील मुख्य अभियंता आणि प्रादेशिक अधिकारी यांची भेट घेऊन नाल्याची दुरुस्ती करता निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली होती. मागणीची दखल घेत शिंदे टोल नाक्याजवळी नाला व रस्ता दुरुस्ती साठी रुपये ३ कोटी ९० लक्ष निधी मंजूर झाल्याचे आमदार यांनी सांगितले असे असतानाच खासदार गोडसे यांनी आता या कामासाठी आपण पुरवठा केल्याने त्यास यश मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकच काम आणि त्यावरून आमदार आणि खासदार यांच्यात श्रेय वादावरून चढाओढ सुरु झाल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *