नाशिक: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आता महापौर पदाच्या हालचालींना वेग आला आहे. आज भाजपने गटनेते पदाची निवड जाहीर केली. इंदिरानगर भागातील भाजपचे नगरसेवक श्याम बडोदे यांची महापालिकेत गट नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची आता नोंदणी करण्यात येणार आहे. महापौरांच्या निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे कुणाच्या नावावर शिककमोर्तब करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्याम बडोदे हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत.