त्र्यंबकेश्वरला नगराध्यक्षा व नगरसेवकांनी एमएसआयडीसीसोबत केली स्थळ पाहणी
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर आला असताना अद्याप कामांना प्रारंभ होत नसल्याने आणि दर्शनपथ, मेनरोड गंगा स्लॅब याबाबत नागरिकांत दिवसेंदिवस वाढत असलेली संभ्रमावस्था या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषद सभागृहात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) संस्थेचे अधिकारी व वास्तुविशारद यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत दर्शनपथ व इतर विकासकामांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी शंका उपस्थित केल्या. नेमके कोणते काम होणार, हे समजावून घेतले. त्यानंतर सर्वांनी मिळून स्थळपाहणी केली. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचा कामांना प्रारंभ होण्याचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.
प्रारंभी दर्शनपथाच्या जागेला भेट दिली. शहरातील प्रमुख रस्ते, मेनरोड गंगास्लॅब परिसराची पाहणी केली. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार व नगरसेवक, नगरपरिषद अभियंता स्वप्नील काकड उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या बाजूला असलेल्या ऋणमुक्तेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर प्रसाद योजनेतून दगड बसवण्यात आले आहेत. अल्पावधीत दगड वर आले आहेत. येथून पूजक, पुजारी आणि स्थानिक भाविक अनवाणी दर्शनाला जातात, तेव्हा ते ठेच लागून पडतात. अल्पावधीत हे काम उद्ध्वस्त झाले आहे.
याबाबत माहिती घेत असताना येथे पूर्वी असलेला प्राचीन दगडी रस्ता बुजवण्यात आल्याचे व त्यावर वेळोवेळी काँक्रीट, पेव्हरब्लॉक व नव्याने अणुकुचीदार दगड बसवले आहेत, हे मंदिराचे विश्वस्त व मुख्य पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी भाजी बाजार कुंभार तलाव पार्किंगच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येणार असून, मेनरोडला नदीपात्रावर असलेला स्लॅब काढून त्याची उंची दोन्ही बाजूंच्या रस्त्याच्या समतल करणार आहोत. शहरातील काही रस्ते दगडीफरशीबाबत माहिती दिली. विकासकामे करताना तोडफोड होणार नाही, ग्रामस्थ विस्थापित होणार नाहीत, याबाबत माहिती देण्यात आली.
शहरातील अंतर्गत रस्ते तयार करताना दीड फूट खोल खोदकाम करण्यात येणार आहे. त्यावर एक फुटाच्या दरम्यान रस्ता होईल व सद्य:स्थितीला असलेली रस्त्याची उंची सहा इंच कमी होईल, असे नियोजन आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणारे पाणी थेट घरात शिरते या समस्येबाबत काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
दर्शनपथ अथवा कॉरिडॉरबाबत स्पष्ट माहिती व अंतिम आराखडा तयार नसल्याचे यावेळेस स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दर्शनपथ तयार करताना तो उपजिल्हा रुग्णालयाची इमारत वगळण्यात येऊन पुढील भूखंडावर होईल, असे संबंधित यंत्रणेने सूचित केले आहे.
दर्शनपथ 67 कोटींचाच होणार
त्र्यंबकेश्वरमधील दर्शनपथाबाबत अद्याप संभ्रमावस्था कायम आहे. 5 ऑक्टोबर 2026 रोजी दर्शनपथ म्हणजेच कॉरिडॉर, तसेच टॉयलेट ब्लॉक आणि परिसर विकास यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यास आता 75 दिवस उलटले. मात्र, याबाबत अंतिम आराखडा तयार नसल्याचे दिसून येते. दर्शनपथासाठी त्र्यंबक नगरपरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे आहे. मात्र, नगरपरिषदेलादेखील एमएसआयडीसी या संस्थेने अधिकृत स्वाक्षरी असलेला नकाशा आराखडा सादर केलेला नाही. सदरचे काम कोणत्या भूखंडावर होणार आणि कशा पद्धतीचे असेल, याबाबत माहिती एमएसआयडीसीने न देता मोघम पत्र देऊन ना हरकत प्रमाणपत्र मागितले असता, ते नगरपरिषदेने देण्यास नाकारले आहे. याबाबत एमएसआयडीसीच्या अधिकृत तांत्रिक सल्लागारांना विचारले असता, त्यांनी दर्शनपथाबाबत वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे अंतिम आराखडा तयार नाही. मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या 249 कोटींच्या आराखड्याबाबत वृत्त चुकीचे होते. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात 67 कोटींंचा दर्शनपथ करण्यात येणार आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
Signs of commencement of work for Simhastha Kumbh Mela
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…