नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा प्रमुख स्थान ञ्यंबकेश्वरच

 

कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी

 

ञ्यंबकेश्वर: गोदावरीचे उगमस्थान असलेले ञ्यंबकेश्वर हे सिंहस्थ कुंभमेळाचे प्रमुख स्थान असल्याचे भारत सरकारच्या राजपत्रात घोषित करण्यासाठी पठपुरावा सुरू केला असल्याचे आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेट यांनी जाहीर केले आहे.ञ्यंबकेश्वरच्या निलपर्वतावर असलेल्या जुना पंचदशनाम आखाडा येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांचे आगमन झाले आहे.शुक्रवारी पुरोहित संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासोबत तीर्थक्षेत्राच्या प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.यावेळेस सिंहस्थ कुंभमेळा पूर्वी पासून  ञ्यंबकेश्वर येथे कुशावर्तावर होत असायचा.शैव आणि वैष्णव आखाडे सर्व येथे स्थान होत असायचे.आजही वैष्णव आखाडयांच्या शाहीस्नानासाठी येथे वेळ राखीव असतो.मात्र नाशिक रामघाट येथे केवळ वैष्णव आखाडे स्नान करतात.ञ्यंबकेश्वर येथेच शेकडो वर्षांपासून सिंहस्थ कुंभमेळा भरतो.असे शासनाने राजपत्रात जाहीर करावे यासाठी पुरावे जमा करणे,न्यायालयीन लढाई लढणे यासाठी सर्व दहा शैव आखडयाचे साधु तसेच पुरोहित संघ एकत्र लढा देणार असल्याचे यावेळेस स्पष्ट करण्यात आले.

 

सिंहस्थ कुंभमेळा 11 वर्षांनी येतो

 

शासन दरबारी सिंहस्थ कुंभमेळा 12 वर्षांनी होतो असे मानले जाते मात्र प्रत्यक्षात हिंदु कालगणने प्रमाणे तीथी नक्षत्र यांचा विचार करता तो कालावधी 11 वर्षांचा असतो असे लक्षात येते.ञ्यंबकेश्वरचा आगामी सिंहस्थ पर्वकाल ऑक्टोबर 2026 मध्ये प्रारंभ होत आहे.हि बाब देखील शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे.आगमी सिंहस्थाच्या दृष्टीने सोयीसुविधांच्या कामास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे.यावेळेस साधू महंत तसेच  आखाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी उपस्थित होते.

 

ञ्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्षांचे संकल्प

 

महंत हरिगिरी महाराज यांचे अशिर्वाद घेऊन नवनिर्वाचीत अध्यक्ष मनोज थेटे यांनी भाविकांसठी संकल्प केले आहेत.यामध्ये ञ्यंबकेश्वर येथे विस्तीर्ण आकाराचे निवारा गृह बांधणे,आलेल्या भाविकांना मोफत महाप्रसाद मिळेल याची व्यवस्था करणे,भगवान परशुराम यांची 108 फुटांची मुर्ती स्थापन करणे असे संकल्प यावेळेस करण्यात आले.

 

ञ्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थाच्या दृष्टिने आता विकास कामांना सुरूवात करण्याची मागणी साधु महंतांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

खासदार हेमंत गोडसे यांच्या सोबत चर्चा

 

जुना आखाडा निलपर्वत येथे खा हेमंत गोडसे यांच्या सोबत महंत हरीगिरी महाराज यांचे सोबत आगामी कुंभमेळा नियोजनाबाबत विस्तृत चर्चा  झाली.गोदावरीस बारमाही पाणी राहील,त्र्यंबकेश्वर रेल्वे बाबत पाठपुरावा करणे,यासारख्या विषयावर महत्वाची चर्चा झाली.  यावेळेस उपस्थित लक्ष्मीकांत थेटे यांनी कुंभमेळा मंत्रालय अथवा प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली.खासदार गोडसे यांनी संसद स्तरावर तसेच मुख्यमंत्री महोदयांकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.यावेळेस बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख  सुरेश गंगापुत्र, विश्वस्त भूषण अडसरे,पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे आखाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी यासह साधू महंत उपस्थित होते.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

23 minutes ago

सिन्नर पालिकेत 15 प्रभागांत निवडून येणार 30 नगरसेवक

प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…

27 minutes ago

मनमाडला प्रभागरचनेबाबत कहीं खुशी कहीं गम

नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…

32 minutes ago

त्र्यंबकेश्वरला सुट्ट्यांमुळे व्यवस्था कोलमडली

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…

37 minutes ago

जनआक्रोश मोर्चाची तयारी; मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे विभागवार मेळावे

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…

40 minutes ago

एमडी विक्री करणारे तीन आरोपी अटकेत

एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…

45 minutes ago