शिलापूर : वार्ताहर
खरे तर तिला गायिका बनायचे होते. गाण्यातच करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हैदराबाद येथील एक युवती थेट घराबाहेर पडली. मुंबई- ठाण्याला निघाली असतानाच तिचा विचार बदलला.. नंतर ती त्र्यंबकला गेली… तेथे दर्शन घेतले. घरातून मुलगी गायब झाल्याने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पालकांसह तेलंगणा पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये या मुलीचा शोध घेत आलेच होते.घरातून पळून आल्यामुळे पुन्हा घरी गेले तर पालक रागावतील. अशी भीती मुलीला वाटत होती. परंतु पोलिसांनी केलेल्या मतपरिवर्तनामुळे मुलगी पुन्हा पालकांकडे परतली.
या बाबत अधिक माहिती अशी की 7 एप्रिल रोजी सायंकाळी तेलंगणा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण राव, जे.व्ही.रंगव्या हे त्यांच्या टिमसह हरवलेल्या शुभांगी (19) हिचा शोध घेण्यासाठी नाशिक येथे आले होते. परंतु त्यांना मुलगी मिळून आली नाही. तिचे दुसरे लोकेशन ठाणे येथे येत असल्याने नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून पुन्हा परत ठाणे येथे जाण्याच्या तयारीत असताना शेवटचा पर्याय म्हणून पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी तात्काळ गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार संतोष उफाङे पाटील यांना आपले सहकारी विजय कपिले, विलास इंगळे यांना बरोबर घेत शोध घाण्याच्या सूचना केल्या. मुलीच्या वडिलांचा केवीलवाणा चेहरा व रडणे यामुळे त्यांना निराश होऊन जाऊ देणार नाही असा मनोमन निश्चय संतोष उफाङे पाटील यांनी केला. मुलीचा मोबाईल नंबर लोकेशन नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याकडे येत असल्याने तिचा माग काढला.शुभांगीशी संपर्क केला. तिची समजूत काढून तिला भविष्यात होणार्या धोक्याची लागलीच जाणीव करून दिली. तिने मला गायक बनण्यासाठी मुंबईला जायचे होते परंतु मी ठाणे येथून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी नाशिकला आले असल्याचे सांगितले. परंतु वडिलांच्या भीतीमुळे घरी जाऊ शकत नाही .अशा भावना तिने पोलिसांशी बोलताना व्यक्त केल्या. हवालदार संतोष उफाङे यांना तिचे मन परिवर्तन करण्यात यश आले. तिला नाशिक रोड रेल्वे स्टेशनला येण्यास भाग पाडले तिच्या वडिलांची समजूत काढली. तिला रागावणार नाही अशी हमी त्यांनी दिली मुलगी स्टेशनवर येताच तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. तिने पोलिसांना सांगितले मी एक चांगली गायक आहे.करिअर करण्यासाठी मी घर सोडले होते. परंतु मुंबई समजून ठाणे येथे गायक कंपनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मला कोणीही मदत केली नाही. म्हणून मी त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी आल्याचे तिने सांगितले. करियर करायला घर सोडण्याची गरज नाही आता युट्युब किंवा व्हाट्सअप वर गायक लोक एक क्लिप टाकतात एक शेंगदाणा वाला कच्चा बदाम चे गाणे म्हणून किती फेमस झाले .कितीतरी गायक त्यात लाईक मिळवून पैसे कमावून करिअर करीत आहेत हे तिला पटवून दिले. घर सोडल्यावर तुझ्यासोबत अनुचित प्रकार घडू शकतो. याची जाणीव करून दिल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व पोलिसांबद्दल कृतज्ञता जागी झाली शुभांगी व वडील राजेश अशोक सुलाकारवे रा.अमर पेठ हैदराबाद तेलंगणा यांनी पोलिसांची प्रशंसा करून कौतुक केले.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…