नाशिक

दिव्यांग बांधवांसाठी सिंगल विंडो

नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना, सेवा व लाभ सुलभ, पारदर्शक आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आलेले ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ हे सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ राज्यभर प्रभावीपणे कार्यरत आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष माहिती अभियान राबविण्यात येत आहे.
हे पोर्टल सिंगल विंडो सिस्टिमच्या तत्त्वावर आधारित असून, दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजनांसाठी अर्ज, नोंदणी, तक्रार निवारण, प्रमाणपत्रे व इतर सेवा डिजिटल माध्यमातून सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे सेवा वितरण अधिक कार्यक्षम, पारदर्शक
झाले आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून सिंगल पोर्टल एन्ट्री ही अभिनव संकल्पना साकारण्यात आली आहे. या संकल्पनेमुळे दिव्यांग व्यक्तींना विविध विभागांच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वारंवार लॉगीन करण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाशी थेट व सुलभ संवाद साधता येणार आहे.
सद्यःस्थितीत राज्यात या पोर्टलवर 13.84 लाख यूडीआयडी नोंदणी, 1,038 संस्था नोंदणीकृत, तसेच 4,897 तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत तालुका व ग्रामपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना पोर्टलशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पोर्टलची लिंक : https://divyang sahayakportal. maharashtra.gov.in/

राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे डिजिटल पाऊल आहे. शासकीय सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा आणि त्यांना स्वावलंबी बनविण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक पात्र दिव्यांग व्यक्तीने या पोर्टलवर नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक समावेशनासाठी महाराष्ट्र शासनामार्फत दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सामाजिक सुरक्षेंतर्गत दिव्यांग-अव्यंग किंवा दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना सामाजिक मुख्य प्रवाहात आणणे, समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या स्वावलंबनास प्रोत्साहन देणे, हा आहे.

Single window for disabled people

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago