नाशिक

सिन्नरला बाजारपेठेत कडकडीत बंद

सिन्नरकर शोकसागरात

सिन्नर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच सिन्नर शहरात शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सिन्नर शहरात फिरून हात जोडून केलेल्या आवाहनाला बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी साथ देत आस्थापना बंद ठेवून शहरात कडकडीत बंद पाळला. शहराबाहेरील काही दुकानांचा अपवाद वगळता शहरातील बाजारपेठेत सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितरीत्या शहर बंदची हाक दिली. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते सागर भाटजिरे, नगरसेवक बाळू उगले, पंकज जाधव, शेखर गोळेसर, उबाठाचे गटनेते मनोज देशमुख, पंकज मोरे, सागर कोथमिरे, माजी बांधकाम सभापती राजेंद्र चव्हाणके, प्रा. राजाराम मुंगसे, अनिल वराडे, हरिभाऊ तांबे, हरिभाऊ वरंदळ आदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी शिवाजी चौक येथून बाजारपेठ, वाजे विद्यालय, खासदार पूल, गंगाधर टॉकीज, नाशिक वेस, व्यापारी बँक चौक, पोस्ट ऑफिस, मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात फिरून सिन्नरकरांना अजितदादांच्या दुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सिन्नरकरांनी प्रतिसाद देत शहर बंद ठेवून
दुखवटा पाळला.

शुक्रवारी 4 वाजता शोकसभा

उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सिन्नरकरांच्या वतीने शुक्रवारी (दि.30) दुपारी 4 वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या स्वर्गीय अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ही सभा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी दिली.

 

Sinnar market strictly closed

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

12 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago