नाशिक

सिन्नर थर्मल पॉवर सुरू होण्याच्या मार्गावर

एनटीपीसीकडून सकारात्मक पाऊल, स्टॉक एक्स्चेंजला दिली व्यवहाराची माहिती

सिन्नर : प्रतिनिधी
मुसळगाव-गुळवंच शिवारात उभारलेला आणि गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला सिन्नर थर्मल पॉवर लि. हा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत एनटीपीसी लि. आणि महाजनको यांनी 3,800 कोटी रुपयांची बोली लावून सकारात्मता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर एनटीपीसी लि. कडून या व्यवहाराबाबत एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज), बीएसईला (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) अवगत करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्यस्तरावर हालचाली सुरू झाल्याने सिन्नरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

शनिवारी (दि. 14) एनटीपीसी लिमिटेडकडून कंपनीचे सचिव रितू अरोरा यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज व बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला सद्यस्थितीतील व्यवहाराची माहिती दिली.
सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेड हा एकूण 1,350 मेगावॉट क्षमतेचा कोळसा आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प असलेली कंपनी आहे. या प्रकल्पात 270 मेगावॉट क्षमतेचे 5 संच टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. प्रारंभी हा प्रकल्प इंडिया बुल्स कंपनीकडे होता. त्यानंतर रतन इंडिया कंपनीकडे तो हस्तांतरित करण्यात आला. मात्र, ही कंपनी दिवाळखोरीत गेल्याने आणि औष्णिक वीजनिर्मितीसाठी आवश्यक कोळसा वाहतुकीचा प्रश्न कायम राहिल्याने प्रकल्पाचे काम रेंगाळले होते.
तथापि, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे आणि उद्योजक प्रतिनिधी यांनी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले. त्याचाच परिपाक एनटीपीसी लि. आणि महाजनको यांनी 3,800 कोटींची बोली लावून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसह तालुकावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सीमाशुल्क दाव्यांचा वाद संपुष्टात

सिन्नर थर्मल पावर प्रकल्पास यापूर्वीच विशेष आर्थिक क्षेत्रातून वगळले आहे. त्यामुळे बोलीदारांचे भविष्यातील 635 कोटी रुपयांचे दायित्व माफ होणार आहे. पुनरुज्जीवित योजनेत महाजनको व एनटीपीसीएल यांनी वित्त कर्जदारांना 3 हजार 720 कोटी रुपये अतिरिक्त तसेच भविष्यातील खटल्याच्या वसुलीचीही ऑफर दिली आहे. ऑपरेशन कर्जदारांसाठी 2 कोटी 50 लाख वेगळे ठेवले आहेत. प्राप्तिकर, कस्टम अशी 1 हजार 995 कोटी रुपये देयके आहेत. खर्च 75 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर ते भरल्यानंतर उर्वरित रक्कम ऑपरेशन कर्जदाराकडे हस्तांतरित केली जाणार आहे.

3 हजारांवर रोजगार निर्मिती शक्य

औष्णिक वीज प्रकल्प सुरू झाल्यास परिसरातील किमान तीन हजार तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, प्रकल्पग्रस्तांनाही त्यामुळे न्याय मिळणार आहे. सिन्नरच्या बाजारपेठेलाही ऊर्जितावस्था येण्यास मदत होईल.

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

2 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

2 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

2 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

2 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

2 hours ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

3 hours ago