सिडको : विशेष प्रतिनिधी
-मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने हटवले. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर केला. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले आहे तसेच पोलीस वाहनांचे देखील नुकसान झाले. पोलीस यंत्रणेने परिस्थितीअतिशय काळजीपूर्वक हाताळली.
दरम्यान, धार्मिक स्थळ हटविण्यास विरोध करण्यासाठी हिंसक जमाव जमला. त्जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि मुस्लिम नेत्यांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली -यावेळी ३ पोलिस वाहनांचे नुकसान झाले . दगडफेकीत सुमारे २१ पोलिस कर्मचारी जखमी झाले. सकाळी धार्मिक स्थळ पाडण्यात आले.दगडफेक करणााऱ्या समाजकंंटकाना अटक सुरू आहे.दरम्यान अतिशय संवेदनशील परिस्थिती असतानाही झोन १ आणि सर्व डीसीपी / एसीपी / सीनियर पीआय आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे जलद कारवाई आणि परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पोलिसांनी सांगितले