राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा
पुणे :
टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5) राज्यभर शिक्षक रस्त्यावर उतरले होते. टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात राज्यातील शिक्षक शाळा बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. मुंबईतील 200 ते 300 च्या जवळपास मुख्यत्वे खाजगी अनुदानित शाळा बंद राहणार असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा होता. राज्यभरातील जवळपास दीड हजार शाळा या बंद राहतील अशी माहिती होती. त्यामध्ये काही विनाअनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसुद्धा समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली होती.
टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 53 पेक्षा कमी वय असणार्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे.